मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेली मालवण येथील बाबा परब मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवशी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरला. मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर भव्यदिव्य आयोजनातील या स्पर्धेची उपांत्य फेरी व अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. रोमहर्षक अंतिम लढतीत शेवटच्या चेंडूवर विजय धाव घेत रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ सलग दुसऱ्या वर्षी ‘निलेश राणे चषक’चा मानकरी ठरला. तर संतोष पारकर कासार्डे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
अंतिम दिवशी स्पर्धेचा थरार अनुभवत मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रत्यक्ष मैदानावर खिळून होते तर लाईव्ह स्वरूपात हजारो प्रेक्षक स्पर्धेशी जोडले होते. सर्वोत्तम आयोजन व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा लक्षवेधी व रंगतदार ठरली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता व अन्य सन्मान देत सर्वाना गौरवण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजप ओबीसी सेल रत्नागिरी जिल्ह्यातील अध्यक्ष संतोष जैतापकर, स्पर्धा उदघाटक उद्योजक डॉ. दीपक परब, स्पर्धेचे सर्वेसर्वा तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सुशील कारखानीस, राजू वडवलकर, अरविंद सावंत, विनायक परब, भाजप मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, परशुराम पाटकर, माजी नगरसेवक तथा आंबा बागायतदार जगदीश गांवकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दाजी सावजी, अभि गावडे, नितीन मांजरेकर, नंदू देसाई, हरीश गांवकर, महेन ढोलम, युवमोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, पपु परब, जगदीश चव्हाण, भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, मोहन वराडकर, राजू बिडये, अमित सावंत, कृष्णा परब, युवमोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, युवा उद्योजक बाळा भोगले, नारायण लुडबे, जॉमी ब्रिटो, संजय कदम, संजय पाताडे, निनाद बादेकर, राज कांदळकर, अक्षय कदम, तुषार लाड, संकेत पाताडे यासह बाबा परब मित्रमंडळ व सहकारी, मालवण क्रिकेट असोसिएशन सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारी रात्री भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात आयोजित या क्रिकेट स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. या मैदानावर अतिशय सुंदर वातावरणात दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी निलेश राणे, बाबा परब आणि त्यांच्या मित्रमंडळाने दिली आहे. भविष्यात या मैदानावरून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, अश्या सदिच्छा ना. राणे यांनी व्यक्त केल्या. राजकारण, समाजकारण यात पुन्हा जोमाने परत आणण्याचे काम बाबा परब मित्रमंडळाच्या या क्रिकेट स्पर्धा व अन्य राजकीय सामाजिक कार्यक्रम या माध्यमातून झाले. असे सांगून निलेश राणे यांनी स्पर्धा आयोजन व बाबा परब यांचे विशेष कौतुक केले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.