सलग दुसऱ्या वर्षी ‘रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ निलेश राणे चषक’ चा मानकरी
संतोष पारकर कासार्डे संघाला उपविजेता
मालवण :
मालवण येथील बाबा परब मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवशी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच ठरला. मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर भव्यदिव्य आयोजनातील या स्पर्धेची उपांत्य फेरी व अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. रोमहर्षक अंतिम लढतीत शेवटच्या चेंडूवर विजय धाव घेत रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ सलग दुसऱ्या वर्षी ‘निलेश राणे चषक’ चा मानकरी ठरला. तर संतोष पारकर कासार्डे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक अंतिम दिवशी स्पर्धेचा थरार अनुभवत मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रत्यक्ष मैदानावर खिळून होते तर लाईव्ह स्वरूपात हजारो प्रेक्षक स्पर्धेशी जोडले होते. सर्वोत्तम आयोजन व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा लक्षवेधी व रंगतदार ठरली.
विजेता, उपविजेता व अन्य जणांना सन्मान देत सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजप ओबीसी सेल रत्नागिरी जिल्ह्यातील अध्यक्ष संतोष जैतापकर, स्पर्धा उदघाटक उद्योजक डॉ. दीपक परब, स्पर्धेचे सर्वेसर्वा तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सुशील कारखानीस, राजू वडवलकर, अरविंद सावंत, विनायक परब, भाजप मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, परशुराम पाटकर, माजी नगरसेवक तथा आंबा बागायतदार जगदीश गांवकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दाजी सावजी, अभि गावडे, नितीन मांजरेकर, नंदू देसाई, हरीश गांवकर, महेन ढोलम, युवमोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, पपु परब, जगदीश चव्हाण, भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, मोहन वराडकर, राजू बिडये, अमित सावंत, कृष्णा परब, युवमोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, युवा उद्योजक बाळा भोगले, नारायण लुडबे, जॉमी ब्रिटो, संजय कदम, संजय पाताडे, निनाद बादेकर, राज कांदळकर, अक्षय कदम, तुषार लाड, संकेत पाताडे यासह बाबा परब मित्रमंडळ व सहकारी, मालवण क्रिकेट असोसिएशन सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी पहिला सेमिफायनल सामना मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या अँजल कोलकत्ता व रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला यांच्यात झाला. कोलकत्ता संघाने ६ षटकात ६१ धावा केल्या. प्रत्युत्तर दाखल रोहित स्पोर्ट्स संघाने रजत मुंडे यांच्या धुव्वाधार अर्धशतक जोरावर अवघ्या ३ षटकात एकही गडी न गमावता ६२ धावांचे लक्ष पूर्ण करत फायनल फेरीत दिमाखात प्रवेश केला.
दुसरा सेमिफायनल मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या संतोष पारकर कासार्डे व राजाराम वॉरिअर तळवडे यांच्यात झाला. कासार्डे संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७ धावा केल्या. राजाराम वॉरीअर हे लक्ष सहज पार करेल असे वाटत असताना कासार्डे संघातील झारखंड चा बॉलर इरफान मलिक याने दोन षटकात अवघ्या ५ धावा देत ३ बळी मिळवत संघाचा विजय निश्चित केला. सांघिक खेळाचे प्रदर्शन कासार्डे संघ फायनल फेरीत दाखल झाला.
*शेवटच्या चेंडूवर रोहित स्पोर्ट्स विजेता*
बाबा परब मित्रमंडळ यांच्या भव्यदिव्य आयोजनास साजेसा अश्याच पद्धतीचा अंतिम सामना प्रेक्षकांना अनुभवता आला. संतोष पारकर कासार्डे संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार आशिष मेहरुल यांच्या ६ बॉल मध्ये ३० धावा या वादळी खेळाच्या जोरावर ६ षटकात ६८ धावा केल्या. ६९ धावांचे लक्ष घेऊन उतरलेली रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाची सुरवात अडखळत झाली. मात्र अनुभवी फलंदाज प्रथमेश पवार याने ऋतिक पाटील यांच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरच्या षटकात ऋतिक पाटील व अन्य एक फलंदाज धावबाद झाल्याने शेवटच्या चेंडूवर १ धावा असे लक्ष राहिले. गोलंदाजांने टाकलेली चेंडू फलंदाजास चकवा देत यष्टीरक्षाकाच्या हाती गेला. मात्र प्रथमेश पवार याने एकेरी धाव पूर्ण करत संघाचा विजय निश्चित केला. प्रथमेश पवार याने नाबाद ३७ धावांची खेळी साकारली. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले निलेश राणे चषक २०२३ चा मानकरी ठरला. विजेत्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघास निलेश राणे चषक व रोख ३ लाख ५० हजार, उपविजेता संतोष पारकर कासार्डे संघास चषक व १ लाख ७५ हजार पारितोषिक देत गौरवण्यात आले. माजी नगरसेवक तथा आंबा बागायतदार जगदीश गांवकर यांच्या वतीने विजेत्या रोहित स्पोर्ट्स संघातील खेळाडूंना प्रत्येकी दोन डझन हापूस आंबा पेटी भेट देण्यात आली.
*वैयक्तिक पारितोषिके*
मालिकावीर आशिष मेहरुल (संतोष पारकर कासार्डे), उत्कृष्ट फलंदाज किरण पवार (रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला), उत्कृष्ट गोलंदाज इरफान मलिक (संतोष पारकर कासार्डे), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋतिक पाटील ( रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला) तर तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक संघ म्हणून अँजल कोलकत्ता, राजाराम वॉरिअर तळवडे यांना गौरवण्यात आले.
स्पर्धेत समानाधिकारी म्हणून बंटी केरकर, पंच म्हणून उमेश मांजरेकर, दीपक धुरी, अँबरोज आल्मेडा, मंगेश धुरी, सुशील शेडगे यांनी काम पाहिले. तर अमोल जमदाडे, शाम वाक्कर, प्रदीप देउलकर, इर्शाद बागवान, बादल चौधरी, विजय बागायतकर यांनी समालोचन केले. गुणलेखक म्हणून गणेश राऊळ, पायस आल्मेडा, विल्सन फर्नांडिस व विजय बागायतकर यांनी काम पाहिले. यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारी रात्री भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात आयोजित या क्रिकेट स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. या मैदानावर अतिशय सुंदर वातावरणात दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी निलेश राणे, बाबा परब आणि त्यांच्या मित्रमंडळाने दिली आहे. भविष्यात या मैदानावरून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, अश्या सदिच्छा ना. राणे यांनी व्यक्त केल्या. राजकारण, समाजकारण यात पुन्हा जोमाने परत आणण्याचे काम बाबा परब मित्रमंडळाच्या या क्रिकेट स्पर्धा व अन्य राजकीय सामाजिक कार्यक्रम या माध्यमातून झाले. असे सांगून निलेश राणे यांनी स्पर्धा आयोजन व बाबा परब यांचे विशेष कौतुक केले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.