You are currently viewing नेमळेतील स्वराली साठे गणित प्राविण्य परिक्षेत तालुक्यात प्रथम

नेमळेतील स्वराली साठे गणित प्राविण्य परिक्षेत तालुक्यात प्रथम

सावंतवाडी

गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत नेमके हायस्कूलच्या स्वराली साठे हिने विशेष प्राविण्य संपादन केले आहे. १०० पैकी ८७ गुण मिळून ती तालुक्यात प्रथम आली आहे तर जान्हवी राऊळ हिला ६७ गुण मिळाले आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक नितीन धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या परिक्षेत सहा विद्यार्थी बसले होते. त्यातील दोघा विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. तिच्या यशामध्ये तिच्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च मध्ये कुमार निमिष उमेश राऊळ या विद्यार्थ्याला ब्रॉंझ मेडल मिळविले. प्रशालेतून यज्ञेश युवराज शिंदे,पूर्वा उमेश लाड,तनिषा मुकुंद आंबेरकर हे विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उमेश राऊळ व नितीन धामापूरकर यांचे मार्गर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर संस्थाध्यक्ष श्री.राऊळ व श्री. राठोड यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा