You are currently viewing “सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते!”

“सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते!”

*”सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते!”*

*जागतिक पुस्तकदिनानिमित्त चिंचवडगावात पुस्तक प्रदर्शन*

पिंपरी

“सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते. वाचनाने जीवनातील सर्व प्रकारचे ताणतणाव कमी होऊन व्यक्तिमत्त्व विकसित होते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी गोखले हॉल, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केले आहे. अक्षय्य तृतीया आणि जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अरुण बोऱ्हाडे बोलत होते. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे – पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर आणि ब. हि. चिंचवडे यांची व्यासपीठावर तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, प्रकाशक नितीन हिरवे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, जलसंपदा अभियंता ज्ञानदेव काळे यांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.

श्रीकांत चौगुले यांनी, “ढवळे ग्रंथयात्रेपासून मराठी साहित्यविश्वात ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात झाली. साहित्यप्रसाराचे माध्यम म्हणून आजपर्यंत ग्रंथ प्रदर्शनांनी मोलाची कामगिरी बजावली आहे!” अशी माहिती दिली. “मोबाइलमध्ये गुंतलेल्या तरुणाईला पुन्हा पुस्तकांकडे वळवणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे हे धाडसाचे काम आहे; परंतु स्थानिक नेतृत्व, प्रकाशक आणि वाचक यांच्या समन्वयातून वाचनचळवळ वृद्धिंगत होऊ शकते!” असे मत संदीप तापकीर यांनी व्यक्त केले.

चित्रसेन गोलतकर यांनी स्वागत केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा गोलतकर यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा