You are currently viewing वस्ञोद्योगातील निर्यात संदर्भात चर्चासत्र संपन्न 

वस्ञोद्योगातील निर्यात संदर्भात चर्चासत्र संपन्न 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व वस्त्रोद्योग समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वस्ञोद्योगातील निर्यातीमधील अडचणी व अद्ययावत प्रयोगशाळा इचलकरंजीमध्ये होणेसंदर्भात चर्चासत्र संपन्न झाले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे यांनी केले.यामध्ये इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगातील प्रमुख केंद्र आहे. येथील उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी सदर चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगून उद्योजकांना निर्यात करताना काही अडचणी अथवा सुचना असतील तर त्यांनी त्या मांडाव्यात, असे सांगितले.

पिडीक्सीलचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल व उपस्थित कारखानदार यांनी निर्यातीमध्ये येत असलेल्या अडचणींबाबत मुद्दे उपस्थित केले. यावेळी निर्यात करतेवेळी कापडाचा दर्जा तपासण्यासाठी उच्चप्रतिची प्रयोगशाळा येथे असणे आवश्यक असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

मुंबईचे वस्त्रोद्योग समितीचे सहाय्यक संचालक लुकेश पाटील यांनी उद्योजकांकडून आलेल्या सुचनांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

सदर चर्चासत्रास दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, वस्त्रोद्योग समितीचे सहाय्यक संचालक लुकेश पाटील, पिडीक्सीलचे अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, कारखानदार दिनदयाल झंवर, सतीश जठार, संतोष पाटील, नंदकुमार कंठाणे, संजय कुरणे, श्रीकांत पाटील, यांच्यासह निर्यात कारखानदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा