सिंधुदुर्गनगरी
येथील जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या व्हीक्टर डान्टस, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या संतोष नानचे यांना संधी देण्यात आली. आज ही निवड प्रक्रिया झाली. दरम्यान निवडीनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते त्या दोघांचेही अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. एकीकडे राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे सिंधुदुर्गात मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा संघाच्या अध्यक्ष पदावरून एकी केली आहे. त्या ठिकाणी डान्टस यांना संधी देण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते.