सावंतवाडी
सृष्टीचे अस्तित्व असणारा सूर्यमालेतील ग्रह व अफाट नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेली आपली ‘पृथ्वी’ म्हणजेच ‘ वासुंधरेचे महत्त्व’ सर्वांना कळावे यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सायना अळवणी’ या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने वसुंधरेबद्दल दर्जेदार माहिती सांगितली. जर वसुंधरा वाचवली तर आपले होणारे फायदे व जर वसुंधरेचे रक्षण केले नाही तर त्याचे होणारे दुष्परिणाम माहितीमध्ये व्यक्त केले गेले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वसुंधरा दिनानिमित्त गीत सादर केले. या दिवसाचे महत्त्व व पृथ्वीवरील नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण कसे केले पाहिजे याबद्दल इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी अप्रतिम माहिती सांगितली. त्याचप्रमाणे, या दिवशी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील विद्यार्थ्यांना या दिनानिमित्त योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारे पृथ्वीचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या व पृथ्वीला मान देणारा हा वसुंधरा दिन स्टेपिंग स्टोन शाळेत सर्वांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.