शिक्षक भारतीची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
तळेरे : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा माध्य उच्च माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीची अंतिम मतदार यादी दिनांक २०/२१ एप्रिल २०२३ रोजी प्रसिध्द होणार असल्याचे समजते. सहाजिकच पतपेढीव प्रत्यक्ष निवडणूक शाळेच्या दिर्घ मुदतीच्या रजा कालावधीमध्ये होण्याची शक्यता वाटते. शाळांना दि. ०३/०५/२०२३ पासून ५/०६/२०२३ पर्यंत उन्हाळी सुट्टी आहे. त्यामुळे या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या मुळ गावी जातात. त्यामुळे या निवडणुकीपासून व मतदानाच्या हक्कापासून बरेचसे सभासद बंचित राहू शकतात. आमचे अधिकतर सभासद बाहेरील जिल्ह्यातील असल्याने त्यांचे आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच यासाठी पूर्व नियोजन झालेले असते. उन्हाळी सुट्टीत स्थानिक सभासदांचे देखील बाहेरगावी जाण्याबाबत नियोजन झालेले असते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परीणाम निवडणूकीवर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सभासद आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतो.
तरी या सर्व बाबींचा विचार करून सिंधुदूर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीचा प्रत्यक्ष निवडणूक १५ जून नंतर सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.