सावंतवाडी
शेर्ले कास रस्त्याच्या डांबरीकरण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासना अंती मागे घेतले. सदरच्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे मंजूर मिळतात काम त्वरित सुरू केले जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सौ.अनामिका चव्हाण यांनी दिले.
शेर्ले कास रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला असून या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहेत सदरच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे यासाठी सरपंच प्रवीण पंडित यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता मात्र सदरचे काम होण्यास चालढकलपणा मिळत असल्याने सरपंच श्री पंडित यांनी ग्रामस्थांसह आज अखेर बांधकामच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
यावेळी उपसरपंच गजानन पंडित, विश्वनाथ पंडित, वैभव पंडित, कृष्णा अमरे, पांडुरंग पंडित, यासह निगुडे चे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, सरपंच समीर गावडे, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान उपोषणकर्त्यांची कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी सदरचे काम मंजुरीसाठी मंडल कार्यालयाकडे सादर केले आहे. मंजुरी प्राप्त होताच तात्काळ काम हाती घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले दरम्यान या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.