You are currently viewing लेखणीची जबाबदारी

लेखणीची जबाबदारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे लिखित अप्रतिम लेख*

*लेखणीची जबाबदारी*
***
*लेखक/कवीचे सद्यःस्थितीवर मूग गिळून बसणे कडेलोटाचे महत्वाचे व जीवघेणे कारण ठरू शकते.आतापर्यंत जागतिक पातळीवर झालेली जी जी क्रांती असेल त्यात तलवार/बंदूकी पेक्षा लेखणीचा लक्षणीय सहभाग होता हे इतिहास ठामपणे सांगतो आहे.*
*मग ज्यांना ज्यांना नैसर्गिकरित्या लेखणी लाभली आहे त्यांनी त्यांनी देशाभिमान व आद्यकर्तव्य म्हणून सामाजात घसरत चाललेली नैतिक पातळीची नोंद घेणे आवश्यक आहे,असे मला वाटते.पक्षीय पातळीवर अथवा वैयक्तिक पातळीवर व्यक्त न होता सामाजिक हिताच्या बाजूने व्यक्त होणे फार गरजेचे झाले आहे*
*जगण्यासाठी प्रेम आवश्यक आहे पण त्याआधी स्वातंत्र्य आवश्यक आहे.स्वातंत्र्य नसेल तर प्रेम तरी कसे व्यक्त करणार/निभावणार? सोन्याच्या पिंज-यातील पोपट गोडगोड बोलतो खरा पण त्याचे पंख छाटलेले असतात हे त्याच्या ध्यानी पण येत नाही. पुढ्यात फेकलेल्या पेरूच्या तुकड्यावरच त्याचे आंधळे समाधान असते. वेळ निघून गेल्यानंतर जेंव्हा तो पिंज-याच्या बाहेर पडतो तेंव्हा खुरडत चालण्याशिवाय त्याच्याकडे काहीच नसते.*

*तथाकथित मोठ्यांना जेंव्हा आपला स्वार्थ साधायचा असतो तेंव्हा ते मुलांच्या हातात खुळखुळा/खाऊ देतात. मुलांची वैचारिक शक्ती गोठवली जाते. ते त्या खेळण्यात वा खाण्यात गुंग असतात.वैचारिक पंगू करण्याची हिच थेअरी राजकारणातही वापरली जाते.भावनिक पातळीवर धार्मिक वेड लावून लोकांना एकतर्फी करण्याची,द्वेषमूलक भावना गोंजारली जाते व त्यातून दोन धर्मात/दोन जातित/दोन गटात वैरभाव पोसला जातो*
*पुर्वीच्याकाळी शिक्षणाचा अभाव होता.त्यामुळे वैचारिक पातळीवर घाला घालणे सोपे होते.तेंव्हा बुध्दीचा विकासच झालेला नव्हता. तेंव्हा मूठभर लोकांनी संघटितपणे बाकी सर्वांना मुर्ख करून ठेवले होते. पण आज शैक्षणिक दर्जा फारच उंचावलेला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या प्रगल्भता वाढली आहे.जाण/पारख वाढली आहे.तरीही असे काही गारुड केले जाते की हे घेतलेले शिक्षण फक्त नोकरीसाठी/पैसे कमाविण्या पुरतेच तर मर्यादित नाही ना,अशी शंका येते आजही माणूस धार्मिक आंधळेपण किती जोपासतो आहे हे लक्षात येते. कोणताही धर्म हा छान,सुंदर माणूसकीने जगण्याची रीत आहे,हे आपण का समजून घेत नाही?*
*आपले नाकर्तेपण/सुखवस्तूपण आपल्या पुढील पिढ्यांना नेस्तनाबूद करणारे आहे. “मला काय त्याचे” ही घातक वृत्ती आज/आता टाळली नाहीतर पुढील सर्व पिढ्या आपणास आरोपीच्या पिंज-यात उभे केल्याशिवाय राहणार नाहीत व तेंव्हा आपल्याकडे बचावाचा एकही मुद्दा असणार नाही.मग काळ आपल्याला क्षमा करणार नाही*
*एक लक्षात ठेवा वाघ,सिंह वा गरुड पाळले जात नाहीत. शेपूट हालविणारा कुत्रा वा शिकवलेले शब्द बोलणारा पोपट पाळला जातो.मग आपण काय व्हायचे ते आपणच ठरविण्याची वेळ आलेली आहे.*
<<<>>>
—यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३
दि.१९/०४/२०२३

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा