You are currently viewing पडेल कॅन्टीन परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची आ. नितेश राणे यांची वनविभागाला सूचना

पडेल कॅन्टीन परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची आ. नितेश राणे यांची वनविभागाला सूचना

देवगड

विजयदुर्ग पत्राचाळ येथे बिबट्याने युवकावर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला होता या परिसरामध्ये तीन बिबटे फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आमदार नितेश राणे यांनी याची दखल घेऊन या परिसरामध्ये तातडीने बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवण्याची सूचना वनविभागाला केली आहे

आमदार नितेश राणे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली व त्यांना या भागात पिंजरे लावण्याची सूचना केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा