सावंतवाडी
शहरातील भाजी मार्केट आठवडा बाजार नव्याने भरवण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शहरातील काही जागा सुचवल्या असून त्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक यांना दिले आहे आपण दिलेल्या जागेचा विचार केल्यास मोती तलावाची शोभा बाधित न होता व्यापारी वर्गाला सुद्धा फायदा होईल.
श्री केसरकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, सावंतवाडी शहरात भाजी मार्केट आठवडा बाजार नव्याने भरवण्यासाठी स्थानिक ग्राहक ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्री करणारे मंडळी यांना वाहतूक बैठकीची व्यवस्था चांगली मिळावी भाजी किंवा अन्य वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिकांना सुरक्षितता वाटावी महागाई मध्ये भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळाव्यात यासाठी शहरात आम्ही सुचवलेल्या जागेचा विचार करण्यात यावा यामध्ये जुने मार्केट पाडून नवीन मार्केट उभे राहीपर्यंत मच्छी मार्केट मॅंगो हॉटेल शांतिनिकेतन शाळा ते गांधी चौक पर्यंत नाल्याच्या स्लॅबवर खोके उभारून गाळेधारक छोट्या व्यापाऱ्यांची सोय पालिका प्रशासनाकडून करण्यात यावी आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला गांधी चौक भाट पेट्रोल पंप ते राऊत परब कापड दुकान नारायण मंदिर जुनी पोलीस चौकी रस्ता ते चोडणकर दुकान रस्ता अशा परिसरात जागा मार्किंग करून देण्यात यावी दुसरीकडे घाटमाट्यावरून टेम्पो भरून जे शेतकरी भाजी फळे विक्रीसाठी आणतात त्यांच्या घाऊक विक्रीसाठी बापूसाहेब महाराज पुतळा ते हाॅटेल मँगो टू पर्यंत एका बाजूने गाड्या उभ्या करून व घावक विक्रीसाठी जिमखाना मैदान स्वार हॉस्पिटलच्या रस्त्यावर जागा देऊन त्यांची सोय करण्यात यावी. या जागेचा विचार केल्यास सावंतवाडीचे भूषण असणाऱ्या मोती तलावाच्या शोभेला कोणतीही बाधा येणार नाही शहरातील व्यापारी वर्गाला सुद्धा याचा फायदा होईल महिला ग्राहक यांना एकत्र खरेदी करता येऊन तेही नुकसान होणार नाही त्यासाठी वरील सूचनांचा विचार करून कार्यवाही व्हावी.