कणकवली :
माजी आमदार, सिंधूरत्न समृद्ध योजना समितीचे सदस्य तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांचा वाढदिवस कार्यक्रम उद्या (ता. १९) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जठार यांच्या या ५८ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा कासार्डे तिठा येथे सायंकाळी ७ वाजता जठार यांच्या निवासस्थानी होणार आहे.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार अँड. अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संध्या तेर्से, रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार, युवा मोर्चा सिंधुदुर्गचे अध्यक्ष भाई सावंत, रत्नागिरीचे अध्यक्ष, अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ऋतुवेद प्रस्तुत स्वरझंकार हा गीत, गझल, नाट्य व नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन प्रमोद जठार मित्रमंडळ सिंधुदुर्ग-रत्नागिरी यांनी केले आहे.