You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील गरीब विद्यार्थ्याना मिळणार मोबाईल : संजना कोरगांवकर

दोडामार्ग तालुक्यातील गरीब विद्यार्थ्याना मिळणार मोबाईल : संजना कोरगांवकर

दोडामार्ग

दोडामार्ग प स सेस फंडातून १ लाख रुपयांची तात्काळ तरतूद करून ते तालुक्यातील शैक्षणिक सुविधासाठी वापरावेत, ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या गरीब मुलांकडे स्मार्टफोन नसतील त्यांना वापरासाठी खरेदी करून स्मार्ट फोन द्यावेत अशी सुचना ज्येष्ठ प स सदस्य बाबुराव धुरी यांनी केली व याला सभागृहाने मान्यता दिली. आता दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्याना स्मार्टफोन मिळणार असल्याचे यावेळी प स सभापती संजना कोरगांवकर यांनी स्पष्ट केले.
आज प स मासिक सभा ऑनलाईन पद्धतीने स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडली, यावेळी प स सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक व बाबुराव धुरी यांच्यात आयी ग्रामसेवक व मांगेली ग्रामपंचायत व भेडशी आरोग्य विभाग यावर गरमागरम चर्चा झाली, यावेळी बाळा नाईक यांनी आक्रमक होत आयी ग्रामसेवाकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावरून ग्रामसेवकांचे अधिकार काय? त्यांनी कोणाकडे दाद मागायला हवी? असा सवाल करत सताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी सदर प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल त्याचा अहवाल पुढील बैठकीत घेऊ असे सांगितले, तर साटेली भेडशी केंद्रशाळेचा मॉडेल स्कुल म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. बांधकाम विभागाने खड्डे भरण्यासाठी ठेका दिला आहे मात्र ठेकेदार काम करत नाही त्यामुळे शासनाच्या नावाने लोक खडे फोडतातत यामुळे या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे असा ठरावही घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा