You are currently viewing संत गोरा कुंभार”

संत गोरा कुंभार”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित पूजनीय संत गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त अप्रतिम काव्यरचना*

*”संत गोरा कुंभार”*

वारकऱ्यांचे महामेरू संत गोरा कुंभार
वैराग्याचे उपासक संसारी निर्विकारIIध्रुII

तेरेडो गावी जन्मले कुंभार घराण्यांत
कुटुंब निर्वाह चाले मडकी थापण्यावरII1II

निर्गुणोपासक सदाचारी निराकार
विठ्ठलाचे नि:सिम भक्त सर्व जाणकारII2II

दोन सख्ख्या बहिणींशी त्यांचा झाला विवाह
निद्रेंत पत्निंना होता स्पर्श कलम केले करII3II

भक्तित झाले दंग लेकरू गेले पायदळी
विठू कृपेने सजीव आले गाऱ्या बाहेरII4II

गोरोबा पत्निसह बैसले नाम किर्तनांत
थोट्या हातांना फुटले हात करितां गजरII5II

गोरोबांनी रचिले असंख्य गोड अभंग
विठ्ठल भक्तिने दंग ना चिंता ना फिकीरII6II

नामदेव ज्ञानेश्वर यांचे समकालीन
नामा शिवाय जाणती व्यर्थ व्यवहारII7II

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा