*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आंदण-*
सासू विचारे तुझ्या बापानी आंदणात दिले काय?
बाप म्हणे, तुमच्या घरी दिली मी दुभती गाय !
शिकवली तिला, कमावून भरते तुमचे घर
तिच्या कष्टाची करा जरातरी कदर !
हुंडा मागून लावता का नवरदेवाची बोली?
तुमच्या मानसिकतेची कधी वाढेल खोली?
कुणी दिलेले का कुठे पुरते
स्वकमाईच सदा लाभते !
नका देऊ सूनेला टोचण्या,
संपतील कधी तुमच्या मागण्या!
नको माझ्या लेकीला सासुरवास
क्षुल्लक कारणांवरून त्रास !
सांगा समजावून जर तिचे चुकले काही
आम्हाही चुकीची पाठराखण करणार नाही!
लेकीच्या पाठीमागे उभे समस्त माहेर
संस्कार, शिकवणीचाच केलाय आहेर!
बाप असा मिळावा प्रत्येक लेकीला
नाही जाणार जीव मग कुठे हुंडाबळीला!
डॅा गौरी एदलाबादकर
——————————————–
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————