You are currently viewing कणकवलीत २८ ते ३० एप्रिल पर्यंत कीर्तन महोत्सव…

कणकवलीत २८ ते ३० एप्रिल पर्यंत कीर्तन महोत्सव…

सांस्कृतिक संवर्धन मंच कणकवलीचे आयोजन; छत्रपती शिवरायांचा इतिहास कीर्तनाच्या रूपाने अनुभवता येणार…

कणकवली

सांस्कृतिक संवर्धन कणकवली च्या वतीने २८ ते ३० एप्रिल पर्यंत कणकवलीत कॉलेजच्या पटांगणावर सायकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कीर्तन महोत्सवाचे होणार आहे. किर्तन ही नवविधा भक्तीमधील पहिली भक्ती आहे देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि त्यातून स्वराज्य स्थापन कसे झाले याचे वर्णन प्रत्यक्ष स्वरुपात अनुभवण्याची पर्वणी म्हणजे श्री. ह. भ.प किर्तनकार चारुदत्त आफळे बुबा यांचे शिवचरित्रावरील ऐतिहासीक किर्तन ऐकता येणार आहे. सिंधुदुर्गवासियांना खऱ्या खुन्या ऐतिहासिक किर्तन महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे. या कीर्तन महोत्सवाना जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावे. तसेच यानिमित्ताने शिवछत्रपतीचे बालपण, राजकीय कारकीर्द व राज्याभिषेक सोहळा या संदर्भातील कीर्तन महोत्सवाप्रसंगी अनुभवता येणार आहे. जिल्ह्यातील जनतेला खऱ्या अर्थाने हा महोत्सव पर्वणी ठरणार असल्याची माहिती संस्कृती संवर्धन संघाच्या वतीने देण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रसंगी संजय राणे, विलास खानोलकर, दीपक बेलवलकर, हरिभाऊ भिसे, सुहास हा परशुराम झगडे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा