You are currently viewing यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित लर्न अँड ग्रो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित लर्न अँड ग्रो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कलाशिक्षक गजानन पोपकर यांनी सादर केले कलांचे प्रात्यक्षिक

 

सावंतवाडी :

आज सावंतवाडीतील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. फिंगरप्रिंट कलरिंग व क्ले मॉडेलिंग अशा दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उदघाटन माजगाव येथील कलाशिक्षक सिद्धेश कानसे, शाळेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व प्राचार्य वेंकटेश बक्षी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

या स्पर्धेच्या सुरुवातीला भोसले स्कूलचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांनी मुलांना फिंगरप्रिंट कलरिंग व फिश मॉडेलिंग या दोन्हीही कलांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. रंगसंगती प्रभावी होण्यासाठी बोटांचा वापर कसा करावा तसेच मातीची प्रतिकृती बनवताना काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.

बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून फ्लाईंग टॉट्स प्री-स्कूलच्या संचालिका सपना पिंगे व संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले उपस्थित होत्या. पाच ते सात वयोगटातील फिंगरप्रिंट कलरिंग स्पर्धेत दक्ष राऊळ याने प्रथम, मीरा देसाई हिने द्वितीय व प्रणिती कालेलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. अयान डिसोझा व ऋग्वेद सावंत यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

आठ ते दहा वयोगटातील क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये श्रेया मेस्त्री हिने प्रथम, आर्या सावंत हिने द्वितीय तर प्राची सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम पोखरे व सानवी टिळवे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रियांका डिसोजा व प्राची कुडतरकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्वेता खानोलकर व नेहा महाडेश्वर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा