*पंजाब नॅशनल बँकेचा १२९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे हायस्कूल वरळी, मुंबई येथे पंजाब नॅशनल बँक विभागीय कार्यालय, मुंबई द्वारा बँकेचा १२९वा स्थापना दिवस बँकेचे कार्यालयीन कर्मचारी व पंजाब नॅशनल बँक, मुंबई विभागाचे प्रमुख जनरल मॅनेजर श्री बी पी महापात्र, उप व्यवस्थापक मुंबई विभाग प्रमुख ओमप्रकाश ओझा तसेच बँकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची प्रशालेचे माजी विद्यार्थी रूपाने विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष लिविन बबन घोलप हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या स्थापना दिनाचे औचित्य साधून बँकेच्या सीएसआर फंडातून शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित केल्या. श्री महापात्र व आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महापात्र यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यात त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या कार्याबरोबरच बँकेचे समाजाप्रती असलेले कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणाचे कार्य मनापासून करावे त्यांना बँक कसलीही कमतरता पडू देणार नाही. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असलेली सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी प्रशालेस दिले. विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी यावेळी प्रशालीचे माजी विद्यार्थी या नात्याने बँकेने विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व मराठा मंदिर बाबासाहेब गावडे शाळेच्या कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांना करून दिली व बँकेला १२९ व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अशाच प्रकारे बँकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी आणखीन काही अत्यावश्यक बाबी पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सोपान मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष लिवीन बबन घोलप, पीएनबी बँकेचे राजीव वासुदेवन (मुख्य व्यवस्थापक, विभागीय कार्यालय मुंबई), वाच्छा जोशी (मुख्य व्यवस्थापक, विभागीय कार्यालय मार्केटिंग प्रमुख मुंबई) सहाय्यक शिक्षक नंदकुमार काळे, सेवक मनोज तांबे यांनी विशेष प्रयत्न केले.