You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनात एक नंबरवर नेणार – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनात एक नंबरवर नेणार – मंत्री दीपक केसरकर

विठ्ठल मंदिर येथील स्वामी समर्थांच्या 125 छायाचित्र प्रदर्शनाचे केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थानचा कायापालट लवकरच करण्यात येणार आहे या ठिकाणी भक्तांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना आपल्या मार्फत देण्यात येते. भक्ती मार्ग हा असा एक मार्ग आहे जो आपल्याला देवाच्या नजीक नेऊ शकतो स्वामी समर्थांचे आत्म पादुका वेंगुर्ला मध्ये आहेत तर साईबाबांचे मंदिरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यामुळे ईश्वराची कृपा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असल्याने जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान आपण दाखवण्यासाठी काम करणार नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनच्या बाबतीत एक नंबर वर नेण्याचा आपला प्रयत्न राहील असे ते म्हणाले. येथील विठ्ठल मंदिरात आयोजित स्वामी समर्थांच्या १२५ दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पार पडले यावेळी श्री केसरकर बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा