कुडाळ
मा. नारायण राणे लघु सूक्ष्म मध्यम कॅबिनेट मंत्री यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला .यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोटीच्या वरील व्यावसाईक उलाढालीतील 76 उद्योजक सहभागी झाले होते .या उद्योग मेळाव्यास MSME चे सहाय्यक प्रबंधक श्री.अनुपम श्रीवास्तव ,लघुउद्योग क्रेडिट फंडचे (CGTMSE) उप महाप्रबंधक श्री धीरज कुमार, व्यवस्थापक, श्री शहाजी के, व्यवस्थापक,संगीता पुजारी तसेच भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक श्री प्रसाद प्रभू , बॅक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक कुमार सिंग ,एचडीएफसी बँकेचे मुख्य प्रबंधक राजका कोर व श्री गणेश सरडा ,अमित जाधव ,आदिनाथ कोरडे तसेच सिंधुदुर्ग लीड बँकेचे मॅनेजर श्री मुकेश मेश्राम उपस्थित होते .
श्री अनुपम वास्तव यांनी लघु सूक्ष्म मध्यम मंत्रालयाच्या योजनांची माहिती दिली . उद्योजकांना मंत्रालयामार्फत कसे सहकार्य केले जाते योजनेचा फायदा घेताना उद्योजकाला येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी मंत्रालयामार्फत पोर्टलवर कशी तक्रार करावी व मार्गदर्शन घ्यावे याचे मार्गदर्शन केले .
धीरज कुमार यांनी दोन करोड ते पाच करोड पर्यंत उद्योजकांना लघुउद्योग क्रेडिट फंडातून ( CGTMSE)कशी मदत केली जाते या योजनेचा कसा उद्योग वाढीसाठी प्रयत्न केला जातो. बँकेकडे कसे प्रकरण करावे. याची संक्षिप्त माहिती देण्यात आली. तसेच या योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या उद्योजकांना शंभर टक्के मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले व ही योजना महाराष्ट्रामध्ये 100% कार्यान्वित असल्याचे सांगितले.
प्रसाद प्रभू यांनी बँकेत कसे प्रकरण करावे याची माहिती देऊन या योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बँकेने कुडाळ येते स्वतंत्र कक्ष उभारला असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले व या कर्ज योजनेचे फॉर्म उपलब्ध करून दिले .
मुकेश मेश्राम यांनी लीड बँक कसे सहकार्य करते व कसा फायदा करून देता येतो उद्योजकाचा सिविल घसरले असले तरी या योजनेचा कसा फायदा घेता येतो. याचे मार्गदर्शन केले .
सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर ,कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर ,सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ धुर्ये व नितीन तायशेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात नवीन उद्योजक व्हावेत असलेल्या उद्योजकांना आर्थिक बळकटी मिळावी .रोजगार देणारा जिल्हा अशी सिंधुदुर्गाची ओळख देशाला व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच उदयोजकता संवादचे आयोजन करण्यात आले आहे. जो उद्योजक सिंधुदुर्गात छोटा मोठा मध्यम उद्योग लावेल त्या उद्योजकाला उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेड कार्पेट घालण्यात येईल असेही सिंधुदुर्ग जिलह्याचे पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याचे विजय केनवडेकर यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.
एक करोड वरील उद्योग गुतवणूक असणारे उद्योग संवाद मेळाव्याला श्री नकुल पार्सेकर ,संजय भोगटे विजय राणे ,श्रीराम शिरसाट, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोडकर निलेश धडाम, डॉ. व्यंकटेश भंडारी ,नंदन वेंगुर्लेकर नारायण जाधव डॉ. पावसकर यांनी व इतर उद्योजकांनी या चर्चेत सहभाग घेतला काजु उद्योग, काथ उद्योग, या उद्योगान वर चर्चा करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योजकांना येत असणाऱ्या अडचणीचा मार्ग काढण्यासाठी मा.नारायण राणे व पालकमंत्री मा.रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संयुक्त सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री मोहन होडावडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.