You are currently viewing महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 16 एप्रिल पर्यंत खारघर ते इन्सुली मार्गावरील अवजड वाहतूक बंद

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 16 एप्रिल पर्यंत खारघर ते इन्सुली मार्गावरील अवजड वाहतूक बंद

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 16 एप्रिल पर्यंत खारघर ते इन्सुली मार्गावरील अवजड वाहतूक बंद

सिंधुदुर्गनगरी

आज 14 एप्रिल 24 वाजल्यापासून ते 16 एप्रिल रोजी 24 वाजेपर्यंत सार्वजनिक हितास्तव खारघर ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र 66 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्यीय महामार्गावरुन होणारी जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर अशा सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील.

सह सचिव राजेंद्र होळकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. यात म्हटले आहे, अपर जिल्हा दंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केलेल्या संदर्भीय अहवालानुसार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा खारघर नवी मुंबई येथे असल्याने या कार्यक्रमाकरीता रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्ह्यातून तसेच बाहेरील राज्यातून सुमारे 15 ते 20 लाख सदस्य, अनुयायी खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवीमुंबई येथे येणार आहेत. सद्यस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर चौपदरीकरणाचे कामकाज चालू असल्यामूळे सदर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बोटलनेक पॉइंट तयार झालेले आहेत.

त्याचप्रमाणे दिनांक 14 एप्रिल  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असून दिनांक शनिवार 15 एप्रिल  व रविवार 16 एप्रिल  रोजी अशी लगातार 3 दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक व पर्यटक तसेच सदस्य, अनुयायी हे मोठया संख्येने आपआपली वाहने घेवून या मार्गावरून प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतूक सुरु राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर प्रश्न उद्भवू शकतो.

त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्तव खारघर ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्यीय मार्ग वरुन होणारी वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुढीलप्रमाणे आदेश देत आहेत.

दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी 24 वाजल्यापासून ते दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी 24 वाजेपर्यंत वरील महामार्ग व इतर राज्य मार्गवर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (अड. अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल ट्रेलर इ. वाहने ) अशा सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील.

वरील निर्बंध दूध, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन, आषधे व भाजीपाला इ. जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू होणार नाहीत. उपरोक्त महामार्ग, राज्य मार्ग च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तथापि, वाहतूकदारांनी सबंधित वाहतूक विभाग,महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घ्यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा