सावंतवाडी
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले संविधान आणि त्यांचे साहित्य आणि महान विचार आजच्या युवा पिढीला ज्ञात व्हावेत यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने या वर्षी जून २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत शाळा व संस्थांमध्ये संविधान जागर व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य चळवळ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष श्री.संतोष सावंत यांनी दिली.
कोकण मराठी साहित्य परिषद तर्फे आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व त्यांच्या स्मृतीस अभिवादनाचा कार्यक्रम सावंतवाडी पालिकेच्या पत्रकार कक्षात करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष श्री.संतोष सावंत व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कोमसाप सदस्य विधीज्ञ नकुल पार्सेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री.सावंत म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि खऱ्या अर्थाने लोकराज्य, लोकशाही प्रस्थापित झाली. पण आज लोकशाही धोक्यात येत आहे की काय? अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या युवा पिढीला संविधान समजायला हवे यासाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान जागर व साहित्य चळवळ अभियान उपक्रम राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील जवळपास १५ माध्यमिक शाळामध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे आजच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ओळख व्हावी हा यामागील हेतू आहे. त्याचप्रमाणे काही सहकारी संस्थांमध्येही संविधान जागर उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वर्षभर साजरी करून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करण्याचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानस आहे.
यावेळी विधीज्ञ नकुल पार्सेकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आज धोक्यात आली आहे. जात-पात धर्मभेद अजूनही मानले जातात. राजकीय मंडळी मतांच्या जोगव्यासाठी लोकशाही धोक्यात आणत आहेत. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आचार आत्मसात करायचे असतील तर त्यांचा जागर करायला हवा असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भरत गावडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे प्रत्येक शाळेमध्ये वाचन व्हायला हवे आणि त्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श तरुणांसमोर उभा केला पाहिजे असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावंतवाडीतील भेटीची आठवण करून दिली. यावेळी सचिव प्रतिभा चव्हाण व दीपक पटेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक गावस यांनी केले.
*संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*
*🖥️ MS-CIT 🖥️*
*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*
*👨🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩🎓
*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*
*🖥️ SSI COMPUTER* 🖥️
*🔹Learn from Expert*
*उपलब्ध कोर्सेस*
*▪️MS-CIT*
*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*
*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*
*▪️Tally Prime*
*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*
*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️
*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*
*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻🏫🧑🏫
*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩💻
*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣
*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒
*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*
*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*
*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*
*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*
*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*
*📲संपर्क :- 9420740740*
*Advt link …👇*
————————————————