असंख्य युवक स्वगृही परतले…
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील माठेवाडा व बाहेरच्यावाड्यातील असंख्य युवक – विद्यार्थ्याचा विद्यार्थी काँग्रेस NSUI मध्ये प्रवेश झाला. भाजपा चे नगरसेवक राजू बेग यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे.
श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचे विश्वासू असलेल्या राजू बेग यांचा राजकीय प्रवास NSUI मधून सुरू झाला होता. काँग्रेस चे ते निष्ठावंत होते. दीपक केसरकर यांचे नेतृत्व स्वीकारून ते राष्ट्रवादीत गेले. बदलत्या राजकीय परिस्थितीत राजू बेग यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारले. अलीकडच्या काळात राजकारणात सीनियर असलेल्या राजू बेग यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अलीकडेच सत्ताधारी नगरसेवक असताना राजू बेग यांनी पाणीप्रश्नावर सावंतवाडी नगर पालिकेच्या आवारात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर राजू बेग यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात ते ज्या पक्षात आहेत म्हणून विरोध होत असल्याची चर्चा झाली.
दरम्यान आज NSUI जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या नेतृत्वाखाली माठेवाडा व बाहेरचावाडा येथील युवकांनी प्रवेश केल्याने मुळात काँग्रेस धार्जिणा असलेला हा प्रभाग भाजपावासी झालेल्या नगरसेवक राजू बेग यांना अडचणीचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू बेग यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
फैसल उर्फ बॉबी अन्वर बेग यांची सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. यावेळी चेतन सोनटक्के, नासीर सवनुर, शारीक शाह, संकेत शेटकर, परेश तांबोस्कर, अनिकेत सांगळे, अतुल गवस, अरशद बेग अनेक युवकांनी केला NSUI मध्ये केला प्रवेश केला.
यावेळी NSUI तालुका उपाध्यक्ष जस्मिन लक्ष्मेश्वर, सावंवाडी शहर NSUI अध्यक्ष शिवम सावंत, NSUI सावंतवाडी तालुका सरचिटणीस इंद्रजित अंगोळकर , सावंतवाडी शहर NSUI सरचिटणीस दीपक पिरनकर , NSUI सदस्य अक्षय पारकर उपस्थित होते.