You are currently viewing मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भेट देत आ. वैभव नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली साजरी

मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भेट देत आ. वैभव नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली साजरी

आ. वैभव नाईक यांची मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भेट..

 

मालवण :

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देत शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व आंबेडकर अनुयायीं समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

चौके बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.मालवण शिवसेना शाखा येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर आंबेडकर अनुयायींच्या वतीने मालवणातील समाज मंदिर एसटी स्टॅण्ड येथून बाजार पेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली.या रॅलीत आ. वैभव नाईक सहभागी झाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवास आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आपले विचार व्यक्त केले. यावेळी ऍड. वैशाली ढोळस, भंडारी हायस्कुलचे वामन खोत, मा.नायब तहसीलदार आनंद मालवणकर व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचे मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना शाखा येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, पंकज सादये, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेष परब, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे, युवती संघटक निनाक्षी शिंदे, नरेश हुले, मनोज मोंडकर, महेंद्र म्हाडगुत, आकांक्षा शिरपुटे, मीना मुंबरकर, स्वप्नील आचरेकर, उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर, सुरेश मडये, यशवंत गावकर आदी
चौके येथे अजित पार्टे, संजय गावडे, कृष्णा चौकेकर, आर. जे. चौकेकर, बी.जी. गावडे, गोपाळ चौकेकर, दुलाजी चौकेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा