You are currently viewing त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, याला सोडणार नाही !!

त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, याला सोडणार नाही !!

काल अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि भक्तांनी अक्षरशः टाहो फोडला. तर दुसरीकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला. त्याला पार्श्वभूमी सुद्धा तशीच होती. पत्रकार म्हणजे सामान्य माणसाचा आवाज उठवून न्याय मिळवून देणारा आणि चुकीच्या गोष्टींना वाचा फोडणारा अशी ओळख होती. पण अर्णब गोस्वामीने पत्रकारितेचे नाव खराब करून भाजपची दलाली सुरु केली. Republic Bharat सारखं बिकाउ चॅनेल उघडून त्याने केंद्र सरकारची चाटायचे काम सुरु केले. तोपर्यंत ठीक होते, पण नंतर त्याने पातळी सोडून टीका करायला सुरवात केली. राहुल गांधीना पप्पू, सोनिया गांधीना ऍन्टीनो कि काय. म्हणजे पत्रकारिता सोडाच, पण कुत्रापण जितका इमानी नसेल, तितका भाजपचा इमानदार कुत्रा बनून हा गोस्वामी इतरांवर भुंकू लागला. नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजपच्या नेत्यांना जितकं दुःख झाले त्याच्या कितीतरीपट जास्त या गोस्वामीला झाले. केंद्र सरकारचा हा पाळीव कुत्रा महाराष्ट्र सरकारवर भुंकू लागला. सरकारवर भुंकत होता तोपर्यंत ठीक होते.

एके दिवशी त्याने कहरच केला, तो म्हणाला….ए उद्धव ठाकरे. आणि त्याच दिवशी मी शपथ खाल्ली याला सोडणार नाही. एक दिवस माझ्याकडे अन्वय नाईक यांच्या पत्नींनी संपर्क केला आणि त्यांचे गार्हाणे मांडले. त्यांनी मला अन्वय नाईक यांची सुसाईड नोट दाखवली, त्यात स्पष्टपणे अर्णब गोस्वामी चे नाव लिहलेले. त्या म्हणाल्या, मी अगोदरच्या सरकारकडे याचना करून करून थकले. पण मला न्याय मिळाला नाही. मी त्यानां स्पष्टपणे सांगितले कि, काळजी करू नका. जर कोणी दोषी असेल, तर तो कोणीही असो त्याला महाराष्ट्र सरकार सोडणार नाही. मी गृहमंत्र्यांना पत्र दिले आणि त्यांच्या पत्नींना आणि कुटुंबियांना पुन्हा पोलिसानं समोर जे काही पुरावे आहेत ते सादर करायला सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सुद्धा त्याची दखल घेऊन ताबडतोप कार्यवाहीचे आदेश दिले. चौकशी सुरु होती. पण गोस्वामीची मजल वाढतच चालली होती. एकीकडे तो मुंबई पोलिसांना शिव्या घालत होता, तर दुसरीकडे शेलक्या शब्दात मुख्यमंत्री महोदय…..शरद पवार साहेब….संजय राऊत साहेब आणि गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर टीका करत होता. महाराष्ट्राची, मराठी माणसाची बदनामी संपूर्ण जगभर करत होता. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याच्यावर हक्कभंग दाखल केला. अध्यक्षांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले. आज अखेर अन्वय नाईक प्रकरणात रायगड पोलिसांनी त्याच्या घरात घुसून त्याच्या मुसक्या आवळल्या. मी रायगड पोलिसांचं अभिनंदन करतो.

प्रवक्ता, आमदार नंतर. पहिला मी शिवसैनिक आहे. मातोश्री, ठाकरे परिवार हे माझे श्रद्धास्थान आहेत. मला उद्धवसाहेबांनी कायमच मोठ्या भावा प्रमाणे प्रेम दिलंय आणि त्यांच्याशी कोणी वेड-वाकडं वागायचा प्रयत्न करेल. तर मी त्याला सोडणार नाही, सांगून ठेवतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा