– रणजित पवार, उपसंपादक – जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लोकांकरीता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने व त्यांच्या सर्वांगीण विकासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविण्यात येतात. ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांना स्वयंरोजगारासाठी अत्यंत लाभदायी आहे. यामध्ये असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाच्या 20 कलमी योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान योजना व बिजभांडवल योजनेकरीता अर्ज करता येतो.या योजने बद्दल अधिक जाणून घेवूया…
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सन 2023-24 या आर्थिक वर्षात हे महामंडळ राबवीत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गंताकर्ज प्रस्ताव सादर करण्याकरीता या महामंडळाच्या योजना अनुसुचित जाती व नवबौध्द लोकांच्या स्वयंरोजगारासाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत अर्ज स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालय दाखल करावे. त्रयस्थ तसेच मध्यस्तीमार्फत कर्ज अर्ज सादर करु नयेत तसेच ते कार्यालयाकडून स्विकारण्यात येत नाहीत.
योजनेचे नाव व स्वरुप.
50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मर्यादा रु. 50 हजारापर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 50टक्के किंवा जास्तीत – जास्त 10 हजारापर्यंत अनुदान देण्यात येते. व उर्वरीत रक्कम बँकमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची असते.
अर्ज करण्यास आवश्यक पात्रता, अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असवा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. वार्षीक उत्पन्न ग्रामीण व शहरी विभागासाठी रु. 3 लाख एवढे आहे. अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा थकबाकीदार नसावा.
बीजभांडवल योजना :- प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 ते रु. 5 लाखापर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा रु. 10हजाराचा समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते. व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाच्या व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास 5 टक्के सहभाग भरावयाचा आहे.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे : – जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला असावा. 7पासपोर्ट आकाराचे फोटो. रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत. कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले पत्र. उदा.वाहानाकरीता व व्यावसायाकरीता लायसन्स, परमीट, बॅच नंबर इ. बँकेचे खाते क्रमांक व पासबुकाची झेरॉक्स महामंडळाच्या नियमानुसार उच्च शैक्षणिक योजनेकरीता कागदपत्रे सादर करावी.
या योजनांचा कर्जप्रस्ताव या महामंडळाच्या विहीत नमुन्यात कर्ज अर्ज वाटप व स्वीकृत कार्यालयीन वेळेत स्थळ जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे आहे.
रणजित पवार, उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग