You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रमी क्लब ठरताहेत कायदेशीर अड्डे….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रमी क्लब ठरताहेत कायदेशीर अड्डे….

जिल्हा प्रशासनाकडून रमी क्लब साठी परवानगी घेऊन आतमध्ये पत्त्यांचे खेळ न खेळता अशा क्लबचा वापर जुगारांचा अड्डा म्हणून केला जातो. कुडाळ तालुक्यातील वाडी येथे असाच एक क्लब सुरू असून …. गजाली आणि वडे सागोती असा लोकांना टोपी घालण्यात तरबेज असणारा हा चीन चा गजाली सांगणारा सुरक्षा रक्षक पुरविण्याचे धंदे करणारा झोलर बादशाह यानेच रमी क्लब च्या नावावर जुगार सुरू करण्यासाठी भाड्याने जागा दिली आहे. चीन चा गजालीवाला हा झोलर बादशाह दुसऱ्यांची जमीन देखील आपलीच म्हणून सांगून लोकांकडून आगाऊ पैसे उचलतो. यानेच जुगारासाठी ही जागा भाड्याने देऊन वाडी येथे जुगाराचा अड्डा सुरू केला आहे.
जिल्हा कार्यालयाची रमी क्लबसाठी परवानगी आहे असे समजते परंतु परवानगी घेतलेल्या कागदावर आयुक्तांचा शिक्का आहे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कागदावर परवानगी प्लेन रमी खेळाची असते, परंतु रमीच्या नावावर सुरू असणाऱ्या या क्लब मध्ये खेळ खेळले जातात का? स्पोर्ट क्लब च्या कॅमेरो खाली पैसे काउंटर वर घेऊन कॉइन दिले जातात, सौदेबाजी कॅमेरो खाली घेतली जाते. काउंटर संपले तर जॉकी कडून काउंटर घेतले जातात.
रमी क्लब म्हणून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतलेल्या या क्लब मध्ये खेळाडूंना नाश्ता, जेवणाची सुद्धा मोफत सोय केली जाते, त्यामुळे एकदा क्लब मध्ये गेलेला खेळाडू कोणत्याही कारणांसाठी बाहेर पडत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर, बाजारपेठेत इतरत्र सगळीकडे मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याची सक्ती केली जात आहे. परंतु रमीच्या नावावर पैशांची उधळण करत चालणाऱ्या या जुगाराच्या अड्ड्यांवर मात्र मेहेरनजर दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता परवानगीचा चेंडू ते जिल्हा प्रशासनाकडे टोलवतात व कारवाई करत नाहीत. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रमी क्लब सुरू होत असून जुगार खेळण्यासाठी नियमबद्ध जागा जुगाऱ्यांना उपलब्ध होत आहे.
संवाद मीडियाने रमीच्या नावावर सुरू असणाऱ्या जुगारांच्या अड्ड्यांचा पर्दापाश केला आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली असली तरी अशा रमी क्लबमध्ये काय धंदे चालतात याची तपासणी होणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्ह्यात गावोगावी भविष्यात जुगाराचे कायदेशीर अड्डे उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

प्रतिक्रिया व्यक्त करा