You are currently viewing नेहरु युवा केंद्राव्दारे तालुक्यामध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करा

नेहरु युवा केंद्राव्दारे तालुक्यामध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करा

नेहरु युवा केंद्राव्दारे तालुक्यामध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी

नेहरु युवा केंद्राव्दारे प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालयामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक म्हणून युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे.  यासाठी उमेदवारांनी  अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी 18 पेक्षा जास्त व 29 पेक्षा कमी असणे आवश्यक. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी करणारा नसावा. निवड झालेल्या युवा स्वयंसेवकाला दर महिना रु.5000 इतके मानधन देण्यात येइल. उमेदवार त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पद हे पगाराची नोकरी नाही तसेच स्वयंसेवक हा कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल.

अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 मे 2023 आहे. तरी अधिक माहिती करीता जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, अ ब्लॉक, तळमजला, ओरोस, जि.सिंधुदुर्ग, ४१६८१२ संपर्क क्र. ०२३६२ २९५०१२  येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) संपर्क साधावा

प्रतिक्रिया व्यक्त करा