वैभववाडी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या राष्ट्रीय आपत्तीत जनसेवेसाठी खंबीरपणे काम करणाऱ्या नारीशक्तीचा वैभववाडी भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं. स. सभापती अक्षता डाफळे, महिला मोर्चा अध्यक्ष भारती रावराणे, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, माजी सभापती शुभांगी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीतील दहा महीलांना नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. सन्मानित करण्यात आलेल्या नारीशक्तीमध्ये आरोग्य सेविका मुक्ताबाई गोसावी, आरोग्य सहाय्यीका वैष्णवी घुगरदरे, आरोग्य सहाय्यीका नुतन जांभवडेकर, आशा स्वयंसेविका उज्वला कुंभार, प्रगतशील शेतकरी अनघा देसाई, आशा स्वयंसेविका वैशाली इस्वलकर, लॅब टेक्निशन विशाखा काळे, आशा स्वयंसेविका सुचिता करकोटे, स. प्रचारक रोहिणी पोरे, ऋषीका राणे यांचा समावेश आहे. या सर्व नारीशक्ती चा वैभववाडी भाजपाच्यावतीने वतीने मंडल अध्यक्ष नासीर काझी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.