मालवण
चिवला बीच लगतच्या वेलणकर चाळीच्या पाठीमागील शौचालयाच्या टाकीत पडलेल्या एका गायीस माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह प्राणीमित्र व पालिका कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
वेलणकर चाळीच्या मागील टाकीत गाय पडली असल्याची माहिती स्थानिक नागरिक राजा वालावलकर यांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच ते स्वतः प्राणीमित्र शिल्पा खोत, दर्शन वेंगुर्लेकर, विनोद करंगुटकर, अशोक फर्नांडिस, निकित वराडकर, हसमुख पाटकर, आकाश वालावलकर घटनास्थळी दाखल झाले. पालिकेचे कर्मचारी आनंद वळंजू, सागर जाधव, रमेश कोकरे यांना बोलावून घेण्यात आले. टाकीत पडल्याने गाय अत्यवस्थ बनली होती. त्यामुळे दोरी बांधून त्या गायीस बाहेर काढत जीवदान देण्यात आले.