दोडामार्ग
येथील सासोली ग्रामस्थांच्या जमिनी एका नामांकित बिल्डरकडुन हडप करण्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात आज संतापलेल्या ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यायालसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच याबाबत आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महसुल प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकाराची तात्काळ दखल घेवून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले, सासोली गावामध्ये अनधिकृत कृषी सनदी विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू आहे. तहसीलदार आणि वन विभाग यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. फार मोठ्या जमिनीमध्ये अनधिकृत प्रमाणे वृक्षतोड सुरू आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांची कत्तल झालेली आहे. सातबारावर जमिनी सामायिक असताना तसेच सातबारा वरील व्यक्तींचे हक्क असताना सुद्धा त्या ठिकाणी खरेदीखत करून त्यांना जागेचा ताबा देण्यात आला आहे. जो सातबारा वरील सहिशेदार आहे. तो या सातबारातून बाहेर जाताना दिसत आहे. असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे.
या ठिकाणी रेराची देखील परमिशन घेतलेली आहे. या कृषी सनदी बेकायदेशीर माध्यमातून मिळवली आहे. संपूर्ण बेकायदेशीर काम हे सुरू आहे. ग्रामस्थांच्या पाठीशी संपूर्ण ठाकरे गट पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सासोली गावामध्ये अनधिकृत काम सुरू आहे. त्याचा अहवाल तहसीलदाराने सादर करावा आणि ज्या भागांमध्ये जे चुकीचे सुरू आहे त्याच्यावरती तहसीलदाराने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेसंबंधित जमिनीच्या सातबारा वर स्थानिक ग्रामस्थांची नावे असून त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्जाचा बोजा ७ कोटी ३५ लाख रुपयांचा बोजा चढवण्यात आला आहे. वन विभागाने जो दंड ठोठवलेला आहे. तो मात्र नाममात्र आहे आणि त्या ठिकाणी झाडांची फार मोठ्या प्रमाणात कत्तल झालेले आहे. जी झाड तोडले गेले आहे त्याचा अहवाल सुद्धा तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरलेली आहे. आणि जी अनधिकृत कृषी सनदी घेतली आहे ती पूर्णतः रद्द व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे. ज्याने ज्याने यामध्ये अनधिकृत काम केलेला आहे मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार तसेच वनविभागचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख भूमिका आहे दोडामार तालुक्यामध्ये महसूल विभागाचा कशाप्रकारे काम सुरू आहे. हे उपोषणाच्या माध्यमातून ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे स्थानिक ग्रामस्थांचा जो अधिकार आहे. तो हक्क डावलण्याचा प्रयत्न हे महसूलचे अधिकारी करताना दिसत आहेत. ही लढाई आम्ही संपूर्ण शासन स्तरावर लढणार आहोत तसेच कायदेशीर मार्गाने लढाई सुरू ठेवणार आहोत. तसेच ही लढाई आम्ही अधिक तीव्र करणार आहोत. ज्या कायदेशीर पूर्तत्या पूर्तता करायचे होत्या त्यांना करता नियम धाब्यावर बसून काम केलं जात आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते सतीश पारकर यांनी दिली आहे.यावेळी डोळा मार्केट तहसीलदार आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.