You are currently viewing किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात आढळला मृतदेह

किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात आढळला मृतदेह

मालवण :

 

किल्ले सिंधुदुर्ग बाजूला समुद्रात स्थानिक मच्छीमारांना शनिवारी एक मृतदेह तरंगताना दिसून आला. वायरी भूतनाथ येथील प्रकाश संभाजी पडवळ (वय-५२) यांचा मृतदेह असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. स्थानिक मच्छिमार यांनी मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

स्थानिक रहिवासी अन्वय प्रभू, हेमंत मोंडकर, संतोष देसाई, जगदीश तोडणकर यांनी मृतदेह किनाऱ्यावर आणण्यास पोलिसांना सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस निरीक्षक अनिल साठे, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती प्रमोद पडवळ यांनी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा