*ओंजळीतील शब्दफुले समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम लेख*
*माती !*
काही गोष्ट चांगली नाही झाली की ,वाया गेली की आपण , ती मातीमोल झाली असं म्हणतो.पण हीच माती किती मौल्यवान आहे! मातीच्या कणाकणाला पाण्याचा ओलावा , कलाकाराची मेहनत आणि काही संस्कार केले की त्याची वीट बनते .वीट वीट एकत्र रचल्या तर भिंत बनते .भिंती एकत्र जोडल्या तर घर बनते . अशा घरात माणसे राहतात .घरातल्या माणसांनी एकत्र आल्याशिवाय अशा घराला घरपण येत नाही.हे घरपण केव्हा येते? एकमेकांची मने जपत ,एकमेकांना समजून ,विवेकाने वागाल तेव्हाच! यासाठी प्रत्येकाने अहंला त्यागलं पाहिजे.घराचं घरपण टिकवणं हे घरातल्या प्रत्येक घटकाचं आद्य कर्तव्य होय.अन्यथा राजवाडासुद्धा भूतखाना बनतो.घरातल्या मोठ्या व्यक्तींचे स्थान लहान मुलांच्या संगोपनासाठी .संस्कारांसाठी,सुरक्षेसाठी फार मोलाचे असते. पण आजकाल हे नवीन पिढीला पटत नाही .पूर्वी घर म्हणजे जणू हसरं गोकुळ !एकमेकांच्या हातावर हात नि पायावर पाय पडला तरी सहन करण्याची वृत्ती होती.आपल्यातलं कष्टाचं,किंबहुना कष्टही वाटण्याची प्रत्येकाची मनापासून तयारी असे.
कालांतराने नोकरीव्यवसायानिमित्ताने ही कुटुंबे इतरत्र पांगली आणि विभक्त झाली. ‘हम दो हमारे दो’च्या पलीकडचं अस्पष्ट दिसायला लागलं.अधनंमधनं गावी जायचं किंवा गावाकडच्यांनी यायचं,तेही अल्पकाळासाठीच.अगदी अलीकडे हेही दृश्य दुर्मिळ होतंय की काय ही भीती वाटू लागली आहे.आई वडील आयुष्यभर आपल्या भल्यासाठी राबलेले असतात .भारतीय परंपरेनुसार ,त्यांची म्हातारपणची काठी होणं हे मुलाचं आद्यकर्तव्य होय.सासरी गेलेल्या मुलीनेही आई वडिलांकडे लक्ष द्यायला हवेच .पण सासरचं घर सांभाळून! आजकाल ‘हम दो और हमारा एक’ अशी स्थिती ब-याच ठिकाणी आढळते.सासरी गेलेल्या मुलीचा ओढा आईवडिलांकडे असतो. तो का नसू नये ? पण सासर तोडून माहेर धरणं हेही समाजात शोभून दिसत नाही. समोरचा चुकला असेल .तर त्याला समज द्यावी.संबंध बिघडू नये म्हणून जपावे .नाती टिकवावीत .नाही तर ‘नाती’ म्हणजे “ना-ती!”ताणल्यानं तुटतं म्हणतात.वीणेची तार ताणल्याशिवय सूर काढू शकत नाही .पण ती जास्त ताणली तर अपेक्षित सूर येत नाहीत. प्रत्येकाने हे ध्यानी घ्यायला हवं .समोरचा समजत नसेल तर काहीकाळ आपण आत्ममग्न व्हावं चिंतन करावं मग एक क्षण असा येईल की आपली चूक आपल्याला उमगेल.तो क्षण ‘संधीचा’. त्याला पकडावे व क्षमायाचना करावी वा क्षमाशील व्हावे.तरच पुन्हा घर हसरं घर होतं.
कवयित्री विमल लिमये यांची घर ‘असावे घरासारखे ‘ही कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते.
*Web link*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————