बांदा
डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान, बांदा यांच्या वतीने बुधवार दिनांक १२ रोजी येथील आनंदी मंगल कार्यालयात व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर निशुल्क व सर्वांसाठी खुले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर हे भूषविणार आहेत. यावेळी मुंबई येथील अर्थशास्त्रज्ञ डॉ. शंकर मोडक, गोव्याचे माजी शिक्षणाधिकारी माधव जोशी, शिवा तोरसकर, बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेज सावंतवाडीचे प्रा. तुकाराम मोरजकर, नारायण मणेरीकर, लेखापरीक्षक चंद्रकांत सावंत, सावंतवाडी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गवस, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी रमेश म्हाडगूत, मानसशास्त्रज्ञ डॉ. चिन्मयी नाईक, नाशिक येथील सैनिक शाळेचे कार्यालय अधीक्षक किशोर केसरकर, प्रगतशील शेतकरी सुनील रेंगडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकार्य केले आहे. तसेच माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर, माजी मुख्याध्यापक अन्वर खान, अजित शिरोडकर यांनी देखील विशेष सहकार्य केले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. मोडक प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर केसरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी मो. ९४२३८०६४४५ किंवा मो. ९८७०७९७९५५ यांच्याशी संपर्क साधावा.