श्री हनुमान जयंतीनिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील विविध हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमांना भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वर्दे येथे आयोजित भजन स्पर्धला उशिरा पर्यंत थांबून त्यांनी भजनांचा आनंद घेतला.
कणकवली शहरातील कांबळी गल्ली बाळ गोपाळ हनुमान मंदिर, कलमठ गावडेवाडी,आरोंदा, कुडाळ बाजारपेठ, वर्दे, आंब्रड येथील हनुमान मंदिरात आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी कणकवली येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,रामू विखाळे,सचिन आचरेकर,वैभव मालंडकर, बंटी पाटकर, विवेकानंद पाटकर,बाळू वालावलकर,कुडाळ येथे राजन नाईक,मंदार शिरसाट, राजू गवंडे,उदय मांजरेकर,संदीप म्हाडेश्वर,संदीप सावंत, पप्पू पालव,सुनील सावंत, आबा मुंज, विठ्ठल तेली, सागर वाळके, श्रीकांत लाड, राजेंद्र मुंज, विनोद कानडे, स्वप्नील मुंज, प्रवीण भोगटे, संतोष तेली, शिरसाट आदी उपस्थित होते.