सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५७ वर्धापन दिन प्रति वर्षाप्रमाणे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती तर्फे साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराजानी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी ज्या ठिकाणी झाली श्री मोरयाचा धोंडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली .श्री किरण आपटे यांनी पौरोहित्य केले. सागराला वंदन करून सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आला. चैत्र शुद्ध पोर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गड प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन दरवर्षी प्रेरणोत्सव साजरा करण्यात येतो. त्याच अनुसरून शिवराजेश्वर मंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून शिव प्रार्थना म्हणण्यात आली . न्यु छत्रपती संभाजी ब्रिगेड कोल्हापूर यांनी व श्री संदीप साळुंखे यांच्या मावळ्यांनी छत्रपतींना चित्त थरारक मर्दानी खेळाची मानवंदना देण्यात आली. सर्वात छोटा मावळा शौर्य मोहिते यांनी लाठी काठीचे प्रात्यक्षिक करून मानवंदना दिली त्याच बरोबर तलवारबाजी दानपट्टा लाटी-काटीअसे विविध शौर्यप्रकार श्री गणेश कदम ओमकार पाटील सौ दीपिका साळुंखे स्वरूपा साळोखे शिवाजी घाडगे यांनी मर्दानी खेळाची मानवंदना दिली यांना अक्षय माने यांनी हलगीची साथ देऊन मानवंदनेत जान आणली .
शिवरायांचे स्तुती पाठक व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर आपल्या जीवाची आहुती देणारे कवी भूषण यांच्या कविता वरील कविता विश्लेषण व संगीताची साथ असणारा *शिवराज भुषण* प्रेरणोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री भूषण साटम यांनी कवी भूषण यांचा कवितांचे अर्थासहित सादरीकरण करण्यात आले .त्यांना महेश तळगावकर हर्षल खराडे व काळसेकर यांनी संगीताची साथ दिली .
प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, सचिव विजय केनवडेकर , उपाध्यक्ष सौ ज्योती तोरस्कर व रामचंद्र नेरकर ,श्री रामचंद्र , दिपक पाटकर, गणेश कुशे, भाऊ सामंत , हेमंत वालकर, सौ. वैशाली शंकरदास जयमाला मयेकर,नारायण धुरी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोडकर मिलिंद झाड. दादा वेगुर्लेकर श्री प्रदीप वेंगुर्लेकर, ललित चव्हाण, मिहिका केनवडेकर , डॉ. मंजु काटकर,सूर्यकांत फणसेकर , विकि तोरसकर, नरेद्र जामसांडेकर सुनील बागवे पराग परब व न्यू छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय केनवडेकर यांनी केले.