उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते डॉ.जयेंद्र परुळेकर यांचे टीकास्त्र
गेले काही दिवस जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा जागोजागी काढण्यात येत आहेत. “मी सावरकर” अशा टोप्या घालून भाजप कार्यकर्त्ये हास्यास्पद रित्या जल्लोष करत आहेत. खरी टोपी सामान्य जनतेच्या आशा आकांक्षांना घातली जात आहे.
खरं तर या यात्रा सावरकरांच्या गौरवार्थ नसून भडकलेल्या महागाई आणि दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी या पासून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा असफल प्रयत्न आहे. आज वि. दा. सावरकर असते तर त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या अपयशी कारभारावरच आसूड ओढले असते.
जनता होरपळत आहे आणि तुम्ही कसल्या गौरव यात्रा काढत आहात…?
असा खडा सवाल डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
डबल इंजिनचंच सरकार असा ढोल पिटणाऱ्या भाजपकडे दररोज वाढणाऱ्या महागाईवर कुठलेही उत्तर नाही. सतत वेगवेगळे धार्मिक, अस्मितेचे मुद्दे पेटवून जनतेची दिशाभूल करणे एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची परिस्थिती ही तर आज बिहार, झारखंड मधील युवकांसारखीच आहे. शिक्षण घेतले पण जिल्ह्यात रोजगार नाही, मग गोवा, मुंबई मध्ये जायचे आणि मिळेल ते काम करायचे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपामध्ये प्रवेश करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगधंदे आणणार, जिल्ह्याचा विकास करणार, जिडीपी वाढणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे वारंवार सांगतात परंतु अजूनही उच्चशिक्षण घेतलेले युवक एक तर सुशिक्षित बेरोजगार म्हणून घरी बसलेत किंवा मोठ्या शहरांकडे वळले आहेत. उद्योगांच्या वल्गना झाल्या, नोकऱ्यांचे मेळावे झाले…परंतु जिल्ह्यात ना रोजगार आले ना कोणी रोजगार येण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सुक्ष्म,लघु, मध्यम उद्योगांची प्रतिक्षा जिल्ह्यातील युवकांना गेले दिड दोन वर्षे आहे, पण जिल्ह्यातील नेतृत्वाला केंद्रीय मंत्रीपद मिळून सुध्दा जिल्ह्यातील युवकांना किती रोजगार मिळाले…? हा संशोधनाचाच विषय आहे.
जिल्ह्यात विमानतळ सुरू झाले त्याचा गाजावाजा प्रमाणापेक्षा जास्त झाला, विमानतळाचे श्रेय घेण्यासाठी ज्याने त्याने विकासाच्या गंगेत हात धुवून घेतले परंतु आज ना विमानतळामुळे विकास झाला ना विमानतळाचा विकास झाला तर विमान सुद्धा कधी वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने उडते, कधी उडालेले बिघाड झाला म्हणून अर्ध्यावरुन परत येते. हा खेळ तर दोरीवर सर्कस करणाऱ्या माकडासारखा झाला आहे.
खरा गौरव हा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हतबल जनतेच्या संयमाचा आहे. जनतेने आता तरी डोळे उघडावेत अन्यथा भविष्यात घोड्यासारखी डोळ्यावर झापडेच लावली जातील म्हणजे आजूबाजूचे काही दिसणार नाही आणि विकास कोण…? कसला…? कुठला…? हे देखील समजणार नाही.
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*