फोंडाघाट
फोंडाघाट मधील पारंपारीक १०० वर्षापुर्वीचे श्री.हनुमान मंदिर मध्ये आज श्रीहनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या मंदिराची देखभाल श्री.सावंत पटेल हे करतात. त्यांचे हे देवुळ फोंडाघाट वासीयांचे श्रध्दास्थान आहे.दर शनीवारी सर्व दुकानदार या ठिकाणी जावुन नारळ अर्पण करतात.नवसाला पावणारा श्री.मारुती म्हणुन लोकं नवस बोलतात.आणि पुर्ण करुन घेतात. समोर पार असुन याठिकिणी निरांजन लावण्याची प्रथा आहे.आज सकाळी ६ वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लोकांची उपस्थिती लक्षणिय होती.