सिंधुदुर्ग :
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून दिनांक ७ व ८ एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घेण्यात यावी, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून देण्यात आली आहे.