You are currently viewing मासळी, बर्फ वाहतुकीबाबत आनंदवाडी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले निवेदन

मासळी, बर्फ वाहतुकीबाबत आनंदवाडी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले निवेदन

देवगड

निपाणी- देवगड रस्त्याला जोड रस्ता आनंदवाडी असून रस्त्यावरून मासळी, बर्फाच्या मोठ्या गाड्या, थ्रि व्हीलर टेम्पो सतत वहातूक करत असतात.
आनंदवाडीचा रस्ता चांभारभाट पर्यंत उताराचा रस्ता डांबरी असल्याने मोठ्य व्यापाऱ्यांच्या मासळी बर्फाच्या गाड्या तसेच चांभारभाट येथून एस. टी. स्टैंड पर्यंत थ्री व्हीलर टेम्पोने मासळी वहातूक होत असते. अश्यावेळी त्या रस्त्यावर मासळीचे खारपाणी (बर्फासहीत) वाहत असते. अश्या रस्त्यावर टू व्हीलर गाड्या मोठ्या प्रमाणात घसरून अपघात होत असतात. अनेक वेळा लहान मुलांना शाळेत, डॉक्टरकडे नेण्याचे धोक्याचे होवून जाते तरी कृपया अश्या प्रकारे अपघात टाळण्याकरिता आपल्या प्रशासना मार्फत वहातूक करणाऱ्या गाड्यांना सुचना देण्यात यावेत. शदर गाड्यांना पर्यायी
म्हणून चांभारभाट ते पोकळे नाका येथून वहातूक करण्याची सुचना देण्यात यावी. अशी मागणी आनंदवाडी ग्रामस्थ यांनी देवगड तहसीलदार याचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.पर्यायी मार्गाचा विचार न केल्यास आनंदवाडी ग्रामस्थ उग्र आंदोलन करतील व त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा