मालवण
गोळवण धवडकीवाडी येथील रहिवासी व नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत असलेल्या श्री. अरूण सहदेव धारपवार यांचे राहते घर सोमवारी रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळाले आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घरात कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. लागलेल्या आगीत लाकडी छप्पर सह घरात उभी असलेली प्लेझर दू चाकी जळून खाक झाली. घरात असलेले सर्व साहित्य, कपडे तसेच छप्पराचे लाकडी सामान जळून सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागलेली समजताच वाडीतील सर्व मंडळींनी आग विझवण्याचे आतोनात प्रयत्न करून आग विझवली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, तलाठी श्री. कांबळे, पोलिस पाटील श्री. राजेंद्र चव्हाण, तसेच गोळवण येथील ग्रामस्थ श्री. नंदू नाईक, श्री भाई चिरमुले, श्री. संदेश पवार, श्री. अशोक धारपवार, श्री. दिनेश कदम, श्री. राजेंद्र धारपवार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.