पाट सोसायटीसाठी निलेश राणेंकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर.
कुडाळ :
तालुक्यातील पाट विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी निलेश राणे यांनी पाट सोसायटीसाठी १ लाख रुपयांची मदत जाहित करत पाट गावच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत करण्याची ग्याही दिली. पाट सोसायटी ही पाट पंचक्रोशीतील महत्वाची सोसायटी आहे. कुडाळ तालुक्यातील सर्वात जास्त खताची विक्री व वापर पाट सहकारी संस्थेच्या माध्यमातून होतो. पण पाट सोसायटीजवळ स्वतःच खत साठवण गोडावून नसल्याने शेतकऱ्यांची मोठो गैरसोय होत होती. याचा विचार करून पाट ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नाबार्ड व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून खत साठवणसाठी गोडावून व संस्था कार्यालय अशी दुमजली इमारत बांधकाम केली, याच वास्तूचा शुभारंभ आज माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोरये यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, माजी सभापती मोहन सावंत, समाधान परब, पाट सरपंच साधना परब, पाट सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पाट सोसायटीचे सर्व संचालक व पाट ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.