You are currently viewing विनय सौदागर यांच्या अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन …

विनय सौदागर यांच्या अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन …

वेंगुर्ले

भोवताल या काव्यसंग्रहानंतर सौदागरांचे अध्यात्म विषयावरील ‘अध्यात्माच्या वाटेवर’ हे वैचारिक पुस्तक प्रकाशित झाले. विनय सौदागर यांच्या ‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रम वेंगुर्ला येथील साईमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांचे हस्ते झाले.
हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरो. तसेच मालवणी मुलुखातील व्यक्तींचे चित्रण करणारे लेख त्यांनी लिहावे, एखादी कादंबरी त्यांचे हातून व्हावी’. असे विचार कवी सुधाकर ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
निमंत्रित वाचकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने स्विकारले होते. मुग्धा सौदागर हिने गायलेल्या एका गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर सचिन परुळकर यानी प्रास्ताविक केले, तर मान्यवरांची ओळख संजय पाटील यांनी करून दिली. स्वागत अवधूत नाईक यांनी केले.
“आपल्या अध्यात्मविषयक शंका दूर होण्यासाठी, मनातील भीती कमी होण्यासाठी व आपल्या जीवनाला दिशा मिळण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तक वाचल्यावर माझ्या मनातील अनेक शंका मिटल्या. ” असे प्रतिपादन दत्तगुरू कांबळी यांनी पुस्तकाचा परिचय करून देताना सांगितले. पुस्तकाचे लेखक विनय सौदागर यांनी पुस्तक लिहिण्यामागची स्वतःची भूमिका स्पष्ट केली, तर वृंदा कांबळी यांनी समाजातील वास्तव लेखनात कसे आणावे, याविषयी मार्गदर्शन केले.

आजगाव ग्रंथालयाचे अध्यक्ष अण्णा झाटये यांनी शुभेच्छा दिल्या. नंतर कार्यक्रमासाठी मालवण येथील लेखिका वैशाली पंडित यांनी पाठविलेला लिखित संदेश वाचून दाखवण्यात आला. तसेत माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू यांनी दूरध्वनी करून कार्यक्रमाचे वेळी शुभेच्छा दिल्या. सातेरी प्रासादिक मंडळाचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम नाईक यांनी लेखकाकडून अधिक पुस्तके लिहून व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ कांबळी यांनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन पूजा बोवलेकर हिने केले, तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा