You are currently viewing गोवा धारगळ येथील आयुर्वेद रुग्णालयाचा सिंधुदुर्गवासियानी लाभ घ्यावा

गोवा धारगळ येथील आयुर्वेद रुग्णालयाचा सिंधुदुर्गवासियानी लाभ घ्यावा

बांदा रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन

बांदा

सिंधुदुर्ग व गोव्याचे नातेसंबंधबरोबरच घट्ट ऋणानुबंध आहेत. गोव्यात धारगळ येथे उभारण्यात आलेले आयुर्वेद रुग्णालय हे जिल्हावासियांसाठी वरदान असून या रुग्णालयातील मोफत चिकित्सा सेवेचा व आयुर्वेद उपचार पद्धतीचा लाभ येथील रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन माजी सभापती तथा रोटरी क्लब बांदाचे उपाध्यक्ष प्रमोद कामत यांनी नेतर्डे येथे केले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था, कडशी मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने नेतर्डे आरोग्य उपकेंद्रात मोफत आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी श्री कामत बोलत होते. या शिबिराचा लाभ गावातील ३२० रुग्णांनी घेतला. यावेळी सर्व तपासण्या व औषधे रूग्णांना मोफत देण्यात आली. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनी, विकार, एलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचा विकार हाडांचे व सांध्यांचे आजार, पक्षाघात वातविकार, मुळव्याध थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग तसेच अन्य जुनाट विकारावर उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आयुष हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम, असिस्टंट प्रोफेसर डॉ. प्रशांत ससाणे, बांदा रोटरीचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव फिरोज खान, डॉ. राहुल घुले, स्वामी विवेकानंद कला क्रीडा संस्था कडशी मोपाचे उपाध्यक्ष उमेश गाड, नेतर्डे सरपंच सुविज्ञा गवस, उपसरपंच प्रशांत कामत, कार्यक्रम प्रमुख आबा धारगळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल खिलारी, ग्रामपंचायत सदस्य परशुराम गवस, देवस्थान समिती खजिनदार विलास गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास रोट्रॅक्ट क्लब ऑफ बांदाचे सहकार्य लाभले. यावेळी बांदा रोटरीचे खजिनदार बाबा काणेकर, सदस्य आबा धारगळकर, प्रवीण शिरसाट, सुधीर शिरसाट, डॉ. प्रसाद कोकाटे, स्वप्निल धामापूरकर, दिगंबर गायतोंडे, रत्नाकर आगलावे, संदीप देसाई, संतोष सावंत, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ, तुषार धामापूरकर, विशाल मळेवाडकर, योगेश परुळेकर, सिताराम गावडे, सचिन मुळीक, सुदन केसरकर यांच्यासह गावातील विलास गवस, कृष्णा गवस, दिलीप गवस, कैलास गवस, सखाराम गवस, आत्माराम गवस, दिनेश गवस, सगुण गवस, समीर देसाई, विष्णू गवस, गीतेश गवस, आदेश गवस, लक्ष्मण गवस, मनोज महाडेश्वर, विनोद गवस, राजन गवस, भक्ती मेस्त्री, श्वेता वराडकर, सुप्रिया पालव, आरोग्य सेविका प्रेमा कदम, मदतनीस वंदना कोरगावकर आदी उपस्थित होते. आभार मंदार कल्याणकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा