You are currently viewing बीडीएस स्पर्धेत सावंतवाडीच्या स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे यश…

बीडीएस स्पर्धेत सावंतवाडीच्या स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे यश…

सावंतवाडी

BDS ची म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या विकासाला चालना देणारी शिष्यवृत्ती परीक्षा होय. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून , स्टेप्पिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता १ ली ते ४ थी च्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले. त्यापैकी, इयत्ता ४ थी मधील ‘ अस्मि धीरज सावंत’ ( गुण ८४) या विद्यार्थिनीने वरील परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले. तर,इयत्ता १ ली मधील अथांश अनंत बांदेकर( गुण ८५), इयत्ता २ री मधील ‘ गिरिजा सागर चव्हाण’ ( गुण ८४) व इयत्ता ३ री मधील ‘ मोहम्मद माज खुनमिर पटेल’ ( गुण ८६) या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकाविले. त्याचप्रमाणे, इयत्ता १ ली मधील प्रार्थना प्रणय नाईक ( गुण ८२) व इयत्ता ३ री मधील अनुक्रमे- गौरीश दिपक परब (गुण८) , मनवा प्रसाद साळगावकर (गुण८१) , निधी बाळकृष्ण शिर्के (गुण ७८) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कांस्य पदक पटकाविले. परीक्षेत सहभागी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत तसेच सौ. प्राची साळगावकर, सौ अमृता सावंत भोसले, सौ आशा डिसूजा या शिक्षकांकडून वरील शिष्यवृत्ती वर आधारित मार्गदर्शन प्राप्त झाले. सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री. रुजूल पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत, शाळेतील सर्व शिक्षकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. व त्यांच्या शिक्षणाच्या पुढील वाटचाली करिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा