You are currently viewing मसुरे कावावाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे कावावाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण / मसुरे  :

 

मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त ५ ते ६ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

५ एप्रिल २०२३ सकाळी ८.०० ते १०.०० अभिषेक व लघुरुद्र, सकाळी १०.०० ते १.०० सत्यनारायण महापूजा, आरती, प्रसाद रात्रौ १०.०० वा. मसुरे भंडारी समाज सेवा संघ निर्मित जय बजरंगबली नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग “शेवटी मीच अपराधी”, ६ एप्रिल २०२३ पहाटे ५.०० वा. श्री देव हनुमान जन्मोत्सव व किर्तन सोहळा, सकाळी ७.०० वा. श्री देव हनुमान पालखी सोहळा महाआरती, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ९.०० ते १०.०० वा. मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबई यांच्यावतीने ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, रात्रौ १०.०० ते २.०० वा. जय बजरंगबली भजन मंडळाचा वारकरी महादिंडी नृत्यसोहळा होणार आहे, उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा