पुणे :
चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला आहे. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.
मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे व सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्यावतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.
मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.