You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात “विकासाची गंगा” पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दिपक केसरकर यांच्यामुळेच  – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग तालुक्यात “विकासाची गंगा” पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दिपक केसरकर यांच्यामुळेच  – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात रविवारी कोट्यावधी कामांचा शुभारंभ व भूमिपूजने शिवसेना पदाधिकारी यांनी केली. दोडामार्ग तालुक्यात ही विकासाची गंगा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून आली आहे, स्थानिक आमदार निधी व महाराष्ट्र राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींच्या निधीतून ही कामे होत असून यामुळे दोडामार्ग तालुका प्रगातीपथावर असल्याचे दिसत आहे, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी विशेष आभार मानले.

यावेळी पाल पुनर्वसन येथे आमदार स्थानिक विकास निधीतुन रस्ता खडीकरण व डांबरीकरण, झरेबांबर व झरेबांबर येथे रस्ता खडिकरण व डांबरीकरण तसेच संरक्षक भिंत बांधणे, तसेच पिकुळे येथील दलित वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरणं आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ संकल्पातून आलेल्या निधीतून उगाडे- कुंब्रल रस्ता व भेडशी-पिकुळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण अशा कोट्यावधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला याविषयी गणेशप्रसाद गवस यांनी ही विस्तृत माहिती दिली.

यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांसह सावंतवाडी विधानसभा मतदारक्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, हर्षद सावंत, गुरुदास सावंत, संदीप गवस, कुंब्रल माजी सरपंच प्रवीण परब यांसह विविध गावातील सरपंच तसेच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा