You are currently viewing फोंडाघाट मार्गावरील १ एप्रिल ते ३१ मे वाहातुक बंद असा मेसेज देवुन प्रशासनाने बनविले एप्रिल फुल

फोंडाघाट मार्गावरील १ एप्रिल ते ३१ मे वाहातुक बंद असा मेसेज देवुन प्रशासनाने बनविले एप्रिल फुल

वाहतूक जैसे थे तैसे… सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

फोंडाघाट

देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते.

असे असतानाही आज सोमवार असल्याने फोंडाघाट मार्गावर दोन ते तीन मीटर वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या प्रशासन आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षता लावल्या आहेत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दिलेल्या मार्गांचा अवलंब न करता फोंडाघाट मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला ग्रामस्थ कंटाळले आहेत. या सर्व वाहतुकीमध्ये कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे एसटी महामंडळाने दखल घेतली होती. व दिलेल्या मार्गावरून एसटी मार्गस्थ होत होत्या. या सर्व प्रकाराची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे आमदार नितेश राणे यांना निवेदन सादर करणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा